आपलं व्यसन – प्रश्नावली 3

पुढील वाक्ये नीट वाचून त्यांची उत्तरे प्रामाणिकपणे द्या.

क्र. प्रश्न होय नाही
. मी पटकन चिडतो/चिडते, पण माझा राग लवकर निवळतो देखील.
. मी नेहमी संयमी असतो/असते.
. लोकांना जाणवते त्यापेक्षा मी खूपच जास्त चिडलेला/चिडलेली असतो/असते.
. कोणी माझी थट्टा केली तर माझे डोके तापते.
. मला कोणी नीट वागवले नाही, तरी मी चिडत नाही
. लोक नुसते भोवताली असले
. मला कधीकधी असे वाटते की माझ्यात दारुगोळा ठासून भरलेला आहे आणि केव्हाही स्फोट होऊ शकतो.
. मला माझ्या मित्राचे वागणे आवडले नाही, तर मी तसे त्याला स्पष्ट सांगतो/सांगते.
. माझे बरेच वेळा इतरांशी दुमत होते.
१०. जेव्हा कोणी माझ्या मताशी न जुळणारा दृष्टिकोन मांडतो तेव्हा मला वाद घालणे जमत नाही.
११. लोकांनी माझ्या हक्कांची कदर केलीच पाहिजे असे मला वाटते.
१२. मी रागावलो असलो तरी अपशब्द वापरत नाही किंवा अप्रिय भाषेचा उपयोग करीत नाही.
१३. मला जर कोणाचा राग आला तर मी नेहमीच त्याला माझे प्रांजळ मत सांगतो/सांगते.
१४. माझ्यावर कोणी ओरडले तर मीही त्याच्यावर नेहमी ओरडतो/ओरडते
१५. मी चिडलो/चिडले की मनाला लागेल असे बोलतो/बोलते.
१६. एखाद्याला त्याची लायकी दाखवून द्यावी असे खूप मनात असून, त्याला त्याची गरज असूनही मला ते जमत नाही.
१७. मी खूपदा धमक्या देतो/देते, पण त्याप्रमाणे वागण्याचा माझा उद्देश नसतो.
१८. वाद घालताना माझा आवाज खूप चढतो.
१९. माझे एखाद्याविषयी चांगले मत नसले तरी मी तसे दाखवत नाही.
२०. एखाद्या गोष्टीबद्दल वाद घालण्यापेक्षा ती सोडून देणे मला बरे वाटते.

गुणांकन:

वाक्ये क्र. , , १२, १९, २० ही वेगळी काढा. ह्या वाक्यांना `होयअसे उत्तर दिले असेल तर शून्य गुण द्या

उत्तर `नाहीअसले तर १ गुण द्या.

उरलेल्या १५ वाक्यांना `होयउत्तर आल्यास प्रत्येकी १ गुण व `नाहीअसल्यास प्रत्येकी शून्य गुण.

गुणांची बेरीज ७ च्या वर गेली असेल तर तुमची उगीच व प्रमाणाबाहेर रागावण्याची प्रवृत्ती आहे असे समजावे लागेल.