माझ्या हातात काय आहे?

योग्य वेळी नाही म्हणायला शिका.

योग्य वेळी नाही म्हणायला शिका.

लक्षात घ्या…!!!
प्रश्न फक्त दोन पद्धतीनेच सोडवता येतात…
एकतर प्रश्न सोडविल्याने किंवा प्रश्न सोडून दिल्याने…

आपला व्यसनाधीनतेचा प्रश्न आपण असाच सोडून देऊ शकत नाही तर तो आपल्याला सोडवता यायला हवा आणि आपल्या या व्यसनाधीनतेचा आजार सोडवण्याच्या वाटचालीत साईरुप व्यसनमुक्ती केंद्र सदैव आपल्या बरोबर असणार आहे.
मनात येणाऱ्या प्रश्नांना आणि समोर उभ्या राहणाऱ्या समस्यांना सामोरं कसं जायचं ते समजत नाही आणि एक मोठं  प्रश्नचिन्ह सतत डोळ्यासमोर उभं राहतं.
या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. व्यसनमुक्तीशी निगडीत असलेली कौशल्यं आत्मसात करायला हवीत.
‘काय’ करायचं ते माहित आहे पण ‘कसं’ याचा पाठपूरावा करायला हवा.

माझ्या हातात काय आहे?

पूर्ण विश्व व्यसनमुक्त करणं की व्यसनमुक्तीची सुरुवात पहिली माझ्यापासून करणं?

icon-green-thumbs-up

मी काय करु शकतो?

  • मी माझं व्यसन थांबवू शकतो
  • मी माझं चुकीचं वर्तन बदलू शकतो
  • मी माझ्या आजारासाठी योग्य उपचार घेऊ शकतो
  • मी माझ्या मनाचा व्यसनमुक्तीसाठी पक्का निर्धार करु शकतो
  • मी मला सुधारण्यासाठी एक संधी देऊ शकतो
  • दारु किंवा तत्सम पदार्थ मला कुणी देऊ केल्यास मी त्यास नाही म्हणू शकतो
  • आजपर्यंत जाणते अजाणतेपणी हातून झालेल्या चूकांची माफी मागू शकतो व पुन्हा त्या चूका होणार नाहीत याची हमी देऊ शकतो
  • मी स्वत:ची काळजी घेऊ शकतो
  • समाजात गेलेली पत मी पुन्हा मिळवू शकतो
  • व्यसनाधीनतेच्या दिवसात कोलमडलेलं माझं वेळापत्रक मी पुन्हा बनवू शकतो
  • व्यसनाधीनतेच्या काळात झालेल्या चुकांवर रडत न बसता व्यसनमुक्तीच्या मार्गावर मी माझं पुढचं पाऊल टाकू शकतो
  • मी माझ्या जीवनशैलीत चांगल्यासाठी काही चांगले बदल करु शकतो
  • मी या कठीण परिस्थितीत सुद्धा खंबीरपणे उभा राहू शकतो, माझा माझ्यावरील विश्वास कायम ठेऊ शकतो
  • मी व्यसनमुक्तीची सुरुवात माझ्यापासून करु शकतो

icon-red-thumbs-downमी काय चुकीचं वागतो

  • मी माझा व्यसनाधीनतेचा आजार मान्यच करत नाही
  • मी स्वत: बदलू शकतो यावर विश्वासच ठेवत नाही
  • मी मला सुधारण्यासाठी संधीच देत नाही
  • दारु किंवा तत्सम पदार्थ मला कुणी देऊ केल्यास मी ते नाकारतच नाही
  • मी माझ्या चुका मान्य न करता त्याचे समर्थनच करत बसतो
  • मी माझं व्यसन थांबवत नाही
  • मी समाजात गैरवर्तन करतो
  • मी माझा दिनक्रम बिघडून टाकतो व पूर्ण दिवस नशेत राहतो
  • आजपर्यंत हातून झालेल्या चुकांवर रडत बसतो आणि त्याच चुका परत करत बसतो
  • मी माझ्या चुकीच्या वर्तनावर दुर्लक्ष करतो
  • मी माझी जीवनशैली व्यसनाने व्यापून टाकतो
  • मी कठीण परिस्थितीत डगमगतो आणि स्वत:ला दारुच्या आधीन करतो
  • मी इतरांनी काय केलं पाहिजे त्याचा विचार करतो आणि मी स्वत: काय केलं पाहिजे याच्याकडे मात्र दुर्लक्ष करतो

 

तुमच्या व्यसनमुक्तीच्या वाटचालीत साईरुप व्यसनमुक्ती विभागाची महत्वाची भुमिका असेल.

साईरुप व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्तीचे मानसशास्त्र, संवाद – वाद – सुसंवाद, व्यसनी व्यक्तीला समजून घेणे, नेमकं कसं बोलावं कसं वागावं, व्यसनी व्यक्तीचे प्रश्न, समस्या कशा हाताळाव्यात, नात्यातील चार आवश्यक गोष्टी, चूकलेली वाट, शिस्त – जबाबदारी – मूल्ये, सर्वसाधारणपणे येणार्‍या समस्या, विवेकनिष्ठ विचारपद्धती या आणि अशा अनेक विषयांना अनुसरून समुपदेशन व योग्य औषधोपचार दिले जातील.

Admission & Rules