Effect on family..

व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाचे पाच प्रकार तयार होतात
१. अप्रत्यक्ष सहकार्य करणारे २. आंधळेपणाने मदत करणारे ३. हताश नातेवाईक ४. भांडण करणारे कुटुंबीय ५. कोरडे नातेवाईक
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबात निर्माण होणारे दोष..
  • प्रत्येकाची दैनंदिनी बिघडते
  • बायकोच्या जेवण बनवण्यात चुका
  • मुलांच्या अभ्यासात चुका
  • आई-वडीलांचे उतार वयात आरोग्याकडे दुर्लक्ष
  • कुटुंब दिशाहीन होते
  • कुटुंबाची निर्णय क्षमता खालावते
  • कुटुंबातील आपापसातील संवाद त्रोटक होतात
  • प्रत्येकजण दुसर्‍याची चूक शोधतो
  • प्रत्येकाला आपापल्या मर्यादांची जाणीव राहत नाही
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाला काय माहिती हवे..
  • दारु हा व्यसनाचा घातक आजार आहे. ज्यास वैद्यकीय मदतीची गरज आहे.
  • शांतपणे बसून व चर्चेने या आजाराच्या मूळापर्यंत पोहचता येऊ शकते.
  • व्यसनाधीन माणसाच्या प्रत्येक चुकांवर पांघरुण घालू नका.
  • व्यसनाधीन व्यक्ती दारु न पिऊन कुटुंबीयांवर उपकार करत नसते.
  • इतर व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संवाद साधा.
  • प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक गरजा व कौटुंबिक गरजा ओळखण्यास शिकले पाहिजे.
  • जगात फक्त त्यांच्याच कुटुंबीयांवर अशी परिस्थिती ओढवलेली नसून इतरही अनेक कुटुंबीयांवर अशी परिस्थिती आलेली असते.
व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाने काय टाळायला हवे..
  • आणलेल्या दारुच्या बाटल्या लपवून ठेवणे किंवा फेकून देणे.
  • व्यसनाधीन व्यक्ती व्यसनाच्या अंमलाखाली असताना त्याच्याशी वाद-विवाद करणे.
  • सतत त्यांच्याशी व्यसनाबद्दल बोलणे.
  • रुग्णांना अवाजवी भीती दाखविणे किंवा शिक्षा करणे.
  • सतत उपदेश देणे.
  • लाच देणे.
  • भावनिक आव्हान देणे.
  • भावनात्मक यातना देणे.