व्यसनाधीनतेची लक्षणे

व्यसनाच्या प्रमाणात होणारी वाढ.

“व्यसनाधीनता” हा एक मानसिक रोग आहे.

आजच्या प्रगत युगात यावर उपाय सुद्धा आहेत. उपायासाठी मानसोपचार तज्ञाची मदत घ्यायला हवी. त्या व्यक्तीला त्याचा आजार समजावून देणे आवश्यक आहे. असे रोगी पूर्णपणे बरे व्हायला कमीत कमी दोन ते तीन वर्षांचा काळ लागतो. हा काळ कुटुंबासाठी परिक्षेचा असतो. त्यावेळी त्यांनी मनोधैर्य खचू न देता स्वत:ला सावरणे गरजेचे असते.

“हर रात के बाद उजाला होता है!” हे कुटुंबानी नेहमी लक्षात ठेवावे.

शारीरिक लक्षणे

  • चेहरा व नाक लालबुंद होणे, नाक चोंदलेले असणे.
  • हात, पाय किंवा चेहर्‍यावर सूज येणे.
  • एकाएकी दृष्टिदोष उद्भवणे
  • हृदय, छातीची दुखणी, खोकला, हृदयविकार इ.
  • यकृताची आकारवृद्धी
  • पुन्हा-पुन्हा संसर्गदोष होणे.
  • अन्नपचनाच्या तक्रारी
  • रक्तदाब अधिक राहणे, चक्कर येणे.
  • हातपाय थरथरणे.
  • विचारांचा गोंधळ आणि आकलनशक्तीचा र्‍हास होणे.
  • स्मरणशक्तीचा र्‍हास होणे.
  • नपुंसकता येणे.

मानसिक लक्षणे

  • सहिष्णुता कमी अथवा अधिक होणे. यामुळे नेहमीच्या नशेसाठी मादक वस्तू कमी अथवा अधिक प्रमाणात लागते.
  • उदास आणि चिंतातुर राहणे.
  • भास होणे.
  • नकारात्मक विचार प्रवृत्ती.
  • चिडचिडेपणा वाढणे.
  • असंबद्ध बडबडणे.
  • तर्कनिष्ठतेचा अभाव
  • निद्रानाश होणे
  • संशयी मनोवृत्ती वाढणे

सामाजिक लक्षणे

  • समाजात व्यसनी म्हणून प्रतिमा निर्माण होते. कामाच्या जागी उशिरा पोहोचणे, नोकरी जाणे व नोकरीच्या इतर समस्या
  • वाईट वागणुकीमुळे कायद्याच्या समस्या उत्पन्न होणे.
  • कौटुंबिक समस्या
  • नातेसंबंध तुटणे.

आर्थिक लक्षणे

  • कमावलेला पैसा व्यसनांवर खर्च होत असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट बनते.
  • पुरेसा पैसा नसल्याने मुलभूत गरजादेखील भागवणं अशक्य होते.
  • मुलांचे शिक्षण, औषधोपचार यासाठी पैसा पुरेसा पडत नाही.