व्यसनाधीनतेचे टप्पे

व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही

सुरुवातीचा टप्पा

व्यसनाचं प्रमाण वाढतं
नशा करण्याची वारंवारिता वाढते.

ब्लॅक आऊट
ब्लॅक आऊट म्हणजे बेशुद्ध पडणं नव्हे, तर नशेच्या भरात आपण काय केलं हे दुसर्‍या दिवशी आठवत नाही.

सदैव नशेचे विचार
नशा केलेली नसताना सुद्धा ‘पुढची नशा कधी करणार’ या विचारांनी मन व्यापलं जातं.

मधला टप्पा

नियंत्रण गमावणं
सुरुवातीला आपण किती पीत आहोत यावरचं नियंत्रण जातं. मग काळ, वेळ याचं भान राहत नाही.

पिण्याचं समर्थन
(‘अमुक – तमुक झालं’) नाहीतर मी नशा केलीच नसती’ अशाप्रकारे स्वत:च्या पिण्याचं / व्यसनाचं समर्थन केलं जातं.

‘मी’ पणा वाढतो
स्वत:चं वागणं चुकीचं आहे ते पटत असतं, पण मान्य नसतं. म्हणून प्रत्येक बाबतीत बढाया मारल्या जातात. मी कुटुंबासाठी एवढं करतो, तेवढं करतो असं सांगितलं जातं.

आक्रमकता
एकूणच वागण्यात आक्रमकता येते. चढा सूर लावला जातो. इतरांच्या अंगावर धावून जाणं, शिवीगाळ करणं असे प्रसंग वारंवार घडू लागतात.

काही काळ नशामुक्त राहून दाखवणं
एव्हाना घरातले प्रश्न तीव्र झालेले असतात. त्यामुळे ‘माझा कंट्रोल आहे’ हे सिद्ध करण्यासाठी काही काळ नशामुक्त राहून दाखवलं जातं.

इथेच कुटुंबीय फसतात.

जुनाट टप्पा

‘बिंज’ (Binge) पद्धतीनं पिणं
काही दिवस सलग २४ तास पिणं तर काही दिवस अजिबात न पिणं. असं आलटून-पालटून चक्र सुरु राहतं.

पिण्याची क्षमता कमी होते
विविध शारीरिक समस्या सुरु झालेल्या असतात. या अवस्थेत थोड्या मद्यपानाने सुद्धा किक् बसते. दारु सहन होत नाही.

नैतिक अध:पतन
सामाजिक / नैतिक बंधनं तोडली जातात. चोरी, व्यभिचार अशा गोष्टी हातून घडतात. संशयग्रस्तता आणि भास होतात.
दैनंदिन कामकाज ठप्प होतं.