मोहाचे क्षण

व्यसनाधीनता या आजारातील मोहाचे क्षण कोणते..

 

  • होळी, रंगपंचमी, गटारी इ. सण
  • अचानक उद्भवलेलं मोठं संकट
  • व्यसनी मित्रांनी केलेला आग्रह
  • व्यसनासाठी अनुकूल वातावरण निर्मिती
  • अकस्मात समोर आलेली दारुची बॉटल
  • चालून आलेली दारु पिण्याची संधी
  • दारु फुकट व सहज उपलब्ध होत असल्यास
no-to-mohache-kshan
मोहाचे क्षण आल्यास काय करावे…

 

  • चुकीच्या गोष्टीला नाही म्हणायला शिका
  • मोहाच्या क्षणाची परीक्षा घ्यायला जाऊ नका
  • मोहाच्या क्षणावेळी मनात आलेल्या नकारात्मक विचारांचे सकारात्मक विचारात रुपांतरण करण्याचा प्रयत्न करा
  • ‘आत्ता या क्षणी माझ्या हातात काय आहे’, ‘मी काय करु शकतो’ याचा विचार करावा व योग्य तो निर्णय घ्यावा
  • ‘असे क्षण माझ्या समोर येऊ शकतात’ हे पहिल्यांदा मान्य करा म्हणजे तुम्ही त्या क्षणाला सामोरे जाऊ शकता (त्या क्षणाला आधीन न होता)
  • मोहाच्या त्या क्षणांना तुमच्यावर भारी व्हायला देऊ नका
  • ‘मी आजारी आहे आणि कोणताही व कितीही मोठा मोहाचा क्षण असला तरी तो माझ्या आजारापेक्षा मोठा नाही.’