आपलं व्यसन – प्रश्नावली 4

खालील `डिप्रेशनची द्योतक वाक्ये वाचा

. मी हे काम/ हा अभ्यास कशाला करतो/करते आहे? ह्यात काहीच अर्थ नाही.

. मला काहीच जमणार नाही. हे सारे प्रयत्न फोल आहेत.

. बाकी सर्वांना हाच अभ्यास किती चांगला जमतो. मलाच काही येत नाही.

. माझे नशीबच खोटे. बाकी सगळ्यांना (उदा. माझ्या वर्गमित्रांना) सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळत गेल्या. त्यांचे शिक्षक चांगले आहेत. त्यांचे पालक त्यांना आधार देतात. मलाच ह्यातले काही मिळत नाही.

. काही तयारीच नाही, तर आज तरी अभ्यास करुन काय फायदा? जाऊ दे झाले.

. मीच वाईट, अपराधी आहे. माझ्या आईवडिलांच्या सर्व आशा मी धुळीला मिळवणार.

. किती मूर्ख आहे मी! इतके दिवस काही प्रयत्न केले नाहीत. आता सर्व आशा संपली.

. जे होणारच होते ते झाले. वर्षभर काहीच प्रयत्न केले नाहीत. आता त्याची फळे भोगावी लागणार. आता प्रयत्नांसाठी फार उशीर झाला आहे.

आता ह्या वाचनानंतर जी भावनिक अवस्था मनात निर्माण झाली, त्याची नोंद पुढील रेषेवर करा.

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०

अजिबात निराशा नाही अतिशय निराश

आता ही पुढे दिलेली वाक्ये वाचा.

. मला ह्या क्षणी असे वाटते आहे की माझ्या प्रयत्नांत काही अर्थ नाही. पण हे विचार मी माझ्या मनातून काढून टाकलेले जास्त बरे, कारण त्यांच्यामुळे माझा तोटा होणार आहे. त्यांच्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम होतो आहे.

. मी मघाशी म्हटले की मला काहीच जमणार नाही. पण मी हे कशावरुन म्हणतो/म्हणते आहे? कारण वर्षभर तर मला अभ्यास बNयापैकी जमत गेला.

. मला ज्याप्रमाणे एकाग्रतेने अभ्यास करायला त्रास होतो आहे तसा इतरांनाही होतच असणार; कारण आम्ही सर्व ह्या परीक्षेच्या तणावाखाली आहोत. कदाचित काही प्रमाणात कमीजास्त त्रास प्रत्येकाला होत असेल. ते बोलून दाखवत नाहीत एवढेच.

. आणि ख़रंच त्यांना काहीच अडचण नसली, तर उलट मी हातपाय गाळून बसता कामा नये. माझ्या स्वभावामुळे जर माझी जास्त घाबरुन जाण्याची प्रवृत्ती असेल तर मी दुप्पट प्रयत्न करीन आणि इतरांच्या जोडीने कार्यक्षम होईन.

. इतरांना जे शिक्षक, जी पुस्तके मिळत गेली, ती मलाही मिळाली. तेव्हा नशिबाला बोल कशाला लावू?

मला जर ह्या क्षणी आधाराची गरज वाटत असेल, तर मी तो आधार माझ्या पालकांकडे, शिक्षकांकडे मागितला पाहिजे. ती एका आळशी माणसाची गोष्ट आहे ना? तो माणूस एका जांभळाच्या झाडाखाली झोपला होता. झाडावरुन एक जांभूळ त्याच्या नाकाजवळ गालावर पडले. पण तो आळसाने वाट पाहत राहिला की कोणीतरी येईल आणि हे जांभूळ माझ्या तोंडात ढकलील. मी जर तसा बसून राहिलो तर मला आयता आधार मिळणार आहे का? मग इतरांचा हेवा तरी कशाला करायचा?

. आतापर्यंत माझी फारशी तयारी झालेली नाही. पण म्हणून ह्यापुढेही मी तयारी करु

नये असे थोडेच आहे? हा विचित्र नियम कुणी केला?

. मी आता मुळीच आशा सोडणार नाही. `बेटर लेट दॅन नेव्हरअशी इंग्रजी म्हण आहे ना? कधीच प्रयत्न न करण्यापेक्षा, उशीरा का होईना सुरुवात केलेली चांगली. न जाणो, कदाचित माझ्या हातून चांगला अभ्यास होईलही. केलाच नाही तर समजणार कसे?

आता पुन्हा एकदा त्याच गुणांच्या रेषेवर खूण करा.

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०

अजिबात निराशा नाही अतिशय निराश

मानसिक ताणतणाव

पुढील प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तराप्रमाणे स्वत:ला गुण द्या. उत्तरात चूक अथवा बरोबर असं काही नाही. प्रश्नावली प्रामाणिकपणे सोडवा.

उत्तर गुण

अगदी नेहमीच

नेहमी

र्‍याच वेळा

कधीकधी (अधूनमधून)

कधीही नाही

नं प्रश्न
मी दिवसाकाठी एकदा तरी संतुलित जेवण घेतो.
आठवड्यातून किमान चार वेळा मला सात ते आठ तास शांत झोप घेता येते.
राहण्याचं ठिकाण व कामाचं ठिकाण यामधील अंतर कापण्यासाठी मला दगदग करावी लागते.
घाम येईपर्यंत आठवडयातून दोन वेळा तरी व्यायाम करतो.
दिवसाकाठी २ ते ३ हून अधिक सिगरेट ओढल्या असे होत नाही.
आठवड्यातून मी पाच सहा वेळा तरी दारु प्यायली असे होत नाही.
मी कोणावर तरी विंâवा कोणी माझ्यावर प्रेम करतं.
माझ्या उंचीला माझं वजन योग्य आहे.
माझ्या मुलभूत गरजा भागविण्याइतपत माझं आर्थिक उत्पन्न आहे.
१० धर्मावरील अथवा देवावरील श्रद्धेने मला मानसिक बळ येतं.
११ मी घरगुता वा मित्रांबरोबर क्लब अशा कार्यक्रमात सहभागी होतो.
१२ माझं मित्रमंडळ (स्नेही, हितचिंतक) आहे.
१३ माझी तब्येत (दृष्टी, श्रवण इ.) ठीक आहे.
१४ मनमोकळेपणा बदलण्यासाठी मला एकदोन जिवलग मित्रमैत्रिणी आहेत
१५ मी माझ्या मनातील राग, द्वेष, चिंता इ. भावना मोकळेपणाने व्यक्त करु शकतो.
१६ घरगुती कामकाजासंबंधी (रोजचे व्यवहार, पैसे इ.) घरातील मंडळींशी मोकळेपणाने बोलू शकतो.
१७ आठवड्यातून एकदा तरी मी मजा करु शकतो.
१८ मी माझयापाशी असलेल्या वेळेची योजना नीटपणे करु शकतो. ज्यायोगे मला घाई करावी लागत नाही.
१९ मी एका दिवसात तीन वेळा चहा कॉफी घेतो.
२० मी दिवसातून काही वेळ स्वत:शी शांत बसू शकतो.

मानसिक तणाव उत्तरं.

तुमच्या उत्तरांप्रमाणे १ ते ५ मधील गुण द्या. त्यांची बेरीज करा. त्यातून वीस उणे करा.

. ३० पेक्षा अधिक गुण मिळाले असता तुम्ही तणावाला बळी पडू शकता.

. ५० ते ७५यांमधील गुण असतील तर तणावाचा तुम्हाला विशेष धोका आहे.

. ७५ वरील गुणांवरुन तुम्हाला तणवाचा जबरदस्त धोका आहे असा निर्देश होतो.

उदा. तुम्हाला उत्तरांप्रमाणे एकूण ७७ गुण मिळाले. त्यामधून वीस वजा केल्यावर५७ गुण मिळाले. म्हणजे तुम्ही दुसर्‍या गटामध्ये आहात. तुम्हाला तणावापासून विशेष धोका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *