सारांश

icon- summary

उपचाराची दोन महत्वाची उद्दीष्ट्ये

  • समाजातून दारु व इतर अंमली पदार्थांचे उच्चाटन करणे
  • जीवनकौशल्य विकसित करण्यासाठी व्यक्तीमध्ये परिणामकारक सकारात्मक बदल घडविणे

निवासी उपक्रम

  • व्यसनमुक्तीच्या उपचाराचा कार्यक्रम निवासी, शिस्तबद्ध असतो. हा कार्यक्रम मानसोपचार तज्ञ, तज्ञ मनोविश्लेषक, तज्ञ चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक आणि परिचारिका यांच्या संघामार्फत चालविला जातो.

मानसिक उपचारपध्दती / मनोविश्लेषक उपचारपध्दती

  • दर दिवशी एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून चांगल्या विचारांवर चर्चा करणे
  • माहितीपर आणि व्यावहारिक मार्गदर्शन तत्त्वे समजावणारी व्याख्यान-सत्रे
  • विविध ज्ञानांचे घटक अधिक मजबूत करण्यासाठी गट-उपक्रम
  • परस्पर समन्वय आणि समर्थन या बद्दल मोकळेपणाने चर्चा
  • वैयक्तिक समुपदेशन
  • AA मिटींग

भेटी पाठपुराव्याच्या

  • ‘पुनर्भेट’ हा उपचाराचा एक महत्वाचा भाग असतो. त्याचा कालावधी तीन ते पाच वर्षाचा असू शकतो. या कालावधीमध्ये रुग्णमित्रास डॉक्टर व समुपदेशकास भेटून वैद्यकीय सल्ला व त्याच्यात होणा-या सुधारणा समजून घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

पुनर्भेटीच्या वेळा

  • वर्ष पहिले – महिन्यातून एकदा किंवा दोनदा
  • वर्ष दुसरे – तीन महिन्यातून एकदा

पुनर्भेटीच्या कालावधीतील सुविधा

  • वैद्यकीय उपचार
  • वैद्यकीय आणि कौटुंबिक समुपदेशन
  • AA मिटींग

कौटुंबिक उपक्रमाची उद्दीष्ट्ये

  • व्यसनाची माहिती पुरविणे.
  • कुटुंबियांना त्यांच्या भावना आणि अडथळे हाताळण्यासाठी मदत करणे.
  • रुग्णमित्र बरा होत असताना त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी कुटुंबियांना प्रवृत्त करणे.

कौटुंबिक सल्ला

  • अंमली पदार्थांसाठी रुग्णाची तपासणी करु नये किंवा त्यांच्या जवळ दारुच्या बाटल्या शोधू नये.
  • व्यसनाच्या आधीन असताना व्यसनी व्यक्ती सोबत वाद-विवाद करु नये.
  • रुग्णमित्राने व्यसन का केले याचे कारण त्याला विचारु नये.
  • व्यसनाधीन व्यक्तीला खोटी भीती किंवा शिक्षा देणे, घरातून बाहेर काढणे किंवा भावनिक दृष्टया कमकुवत बनविणे असे प्रकार करु नये.
  • व्यसन ही एक गंभीर समस्या आहे ज्याच्यासाठी व्यसनमुक्तीकेंद्राची गरज आहे याचा स्वीकार करणे.
  • व्यसन आणि त्याविषयीच्या समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करणे.
  • रुग्णमित्र अंमली पदार्थ सोडून आपल्यावर उपकार करतोय असा गैरसमज करुन घेऊ नये.
  • रुग्णमित्राच्या आजारासंबंधात कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत प्रामाणिकपणे मोकळेपणाने संवाद साधावा.
  • ‘फक्त आजचा दिवस’ या मंत्राने व्यसनमुक्तीची सुरुवात करावी.
  • स्वत:ची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घ्यावी.
  • स्वयंसहाय्यता गटाकडून आपल्याला मदत मिळू शकते, आपण एकटे नाही.
  • निरोगी आयुष्यासाठी काही छंद जोपासावेत.

रिकव्हरीच्या कालावधीत कुटुंबियांना मदत होईल असे शक्य असणारे वर्तनातील बदल

  • रुग्णमित्रावर छोट्या छोट्या कामाची जबाबदारी सोपवणे.
  • रुग्णमित्रावरचा विश्वास वाढविण्याचा प्रयत्न करणे.
  • ‘रुग्णमित्र पुन्हा दारु प्यायला तर..!’ ही चिंता मनातून काढून टाकणे.
  • रुग्णमित्राकडून जास्त अपेक्षा करणे टाळणे.
  • सुसंवाद साधणे.
  • रुग्णमित्राच्या मनातील न्यूनगंड कमी करण्याचा प्रयत्न करणे.

उपचार

  • व्यसनाधीनता – बरा होणारा आजार
  • दारुची वस्तुस्थिती – दारुच्या सर्व प्रकारांमध्ये भावनांत बदल घडविणारा एकच घटक समाविष्ट असतो तो म्हणजे ‘इथिल अल्कोहोल’. फक्त प्रत्येक प्रकारामध्ये त्याचे प्रमाण वेगळे असते.
  • दारुमध्ये कोणत्याही प्रकारचे पोषक घटक नसतात तसेच आरोग्य सुधारण्यासाठी दारुची कोणत्याही प्रकारे मदत होत नाही.
  • दारु प्यायल्यावर ती लगेच मेंदूपर्यंत पोहचते व हळुवार मेंदूच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात करते.
  • दारु म्हणजे कोणतेही उत्तेजक द्रव्य किंवा औषध नाही. ते केवळ मेंदूच्या काम करण्याच्या मार्गात अडथळे आणते.
  • मद्यपान कधीही चिंता, काळजी किंवा निराशा यांसारख्या नकारात्मक भावना हाताळण्यासाठी मदत करत नाही. ते फक्त या भावनांची तीव्रता कमी करुन सुस्ती आणण्याचे काम करते.
  • मद्यपान आपल्या नेहमीच्या झोपेच्या पद्धतीत अडथळे आणते.
  • दारुमुळे येणारी ग्लानी माणसाची शांत व गाढ झोप प्रतिबंधीत करते.
  • दारुमुळे कोणतीही व्यक्ती अष्टपैलू बनत नाही किंवा ती विनोदी, हुशार बनत नाही. ती त्यावेळी नशेत असते.

व्यसनाधीनता एक आजार

  • जी माणसे व्यसन करतात किंवा दारु पितात त्यातली २० टक्क्याहून अधिक माणसे व्यसनाधीनतेच्या आजाराला बळी पडू शकतात.
  • जगातला कोणताही माणूस व्यसनाधीनतेच्या आजाराला बळी पडू शकतो. त्यात वय, शिक्षण, बुद्धीमत्ता या कशाचाही संबंध नाही.
  • व्यसनाधीनता हा हळूहळू वाढत जाणारा व सर्वस्वाचा नाश करणारा आजार आहे.
  • एकदा व्यसनाधीनतेचा आजार झाला की तो नुसताच “मी माझ्या मनाने ते कधीही सोडवू शकतो” अशा नुसत्या विचाराने बरा होऊ शकत नाही.
  • फक्त सल्ल्याने, त्यांना घाबरल्याने, नोकरी बदलल्याने किंवा राहते घर बदलल्याने किंवा त्याचे कर्ज फेडून दारु सुटू शकत नाही.
  • व्यसनाधीन व्यक्तीने योग्य उपचाराअंती पूर्णत: दारु सोडणे व आयुष्यभर आपल्या या विचाराशी प्रामाणिक राहणे हाच त्यावरचा एक मार्ग आहे.
  • एकदा का व्यसन सोडले की कुठलीही व्यसनाधीन व्यक्ती पूर्वीप्रमाणे चांगले आयुष्य घालवू शकते.