आपलं व्यसन – प्रश्नावली 2

प्रत्येक वाक्य वाचायचे आणि ते सध्या तुमच्या बाबतीत खरे आहे का, हे तुमच्या बाबतीत घडते का, तुम्हाला असा अनुभव येतो का हे ठरवायचे आहे. अर्थात अगदी खरे उत्तर लिहायचे आहे कारण नाहीतर आपले निष्कर्ष चुकतील.

क्र. प्रश्न होय नाही
. मला नेहमीपेक्षा घाबरल्यासारखे, चिंतातुर वाटते.
. काही कारण नसताना मला भीती वाटते.
. मी पटकन् विचलित होतो / होते किंवा एकदम भेदरुन जातो / जाते.
. मला असे वाटते की मी टिकाव धरु शकणार नाही. माझा परिस्थितीवरील ताबा सुटतो.
. मला असे वाटते की सगळे काही ठीक होईल. काही वाईट घडणार नाही.
. माझे हातपाय कापतात, थरथरतात.
. मला डोकेदुखीचा, मान व पाठदुखीचा सारखा त्रास होतो.
. मला अशक्त वाटते आणि पटकन् थकवा येतो.
मला शांत वाटते आणि निश्चल बसता येते.
१०. मला माझ्या हृदयाचे जलद ठोके जाणवतात.
११. मला वारंवार घेरी येते.
१२. मी बेशुद्ध पडेन असे वाटते व तसे होतदेखील.
१३. मला स्वसनाचा काही त्रास नाही.
१४. माझ्या हातापायांची बोटे बधीर होतात आणि मुंग्या आल्यासारखे वाटते.
१५. मला पोटदुखीचा, अपचनाचा त्रास होतो.
१६. मला वारंवार लघवीला जावे लागते.
१७. माझे हात पुरेसे उष्ण व कोरडे असतात.
१८. माझा चेहरा लाल झाल्याचे, गरम झाल्याचे मला जाणवते.
१९. मला चटकन् आणि रात्रभर शांत झोप लागते.
२०. मला भीतीदायक स्वप्ने पडतात.

गुणांकन:-

वरील वाक्तील ५, , १३, १७ व १९ ही वाक्ये बाजूला काढा.

बाकी १५ वाक्यांना जर `होयलिहिले असेल तर प्रत्येकी १ गुण द्या व उत्तर नाही असेल तर शून्य गुण द्या.

, , १३, १७ व १९ ह्या वाक्यांना मत्र `होयह्या उत्तराला प्रत्येकी शून्य गुण व उत्तर `नाहीअसले तर १ गुण

द्या.

ह्या गुणांकनाप्रमाणे चिंतेचा सर्वोच्च बिंदू गाठलेल्या माणसाला २० गुण मिळतील.

जर गुणसंख्या ७ च्या वर गेली, तर तुम्हाला `एंग्झायटीम्हणजे चिंतेचे थोड्याफार प्रमाणात बळी आहात. अशा वेळी समुपदेशन म्हणजे `कौन्सेलिंगचा आधार घेणे. त्यातून आपल्याला असलेल्या तणावावर मात करण्यासाठी मार्ग सापडतात.