आपलं व्यसन – प्रश्नावली 1

पुढील प्रश्नावली व्यसनी व्यक्तीने त्यांच्या कुटुंबियांसोबत सोडवावी

प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.

१) कधीही नाही २) कधीतरी २) बर्‍याचदा ४) नेहमी

तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांना खालिल प्रमाणे गुण देऊ शकता…

१) कधीही नाही – १ गुण २) कधीतरी – १ गुण ३) बर्‍याचदा – २ गुण ४) नेहमी – ३ गुण

अशा पद्धतीने मुल्यांकन करा आणि सर्व गुणांची बेरीज करा. तुमच्या गुणांचा अर्थ काय यावरुन तुमचा आजार

कोणत्या टप्यात आहे, याचा अंदाज लागु शकेल.

गुण आणि त्याचा अर्थ पुढील प्रमाणे :-

तुमचे गुण अर्थ

१-९ आजाराचा पहिला टप्पा
१०-१९ आजाराचा मधला टप्पा
२०-४५ आजाराचा जुनाट टप्पा

 

प्रश्न कधीही नाही कधीतरी बर्‍याचदा नेहमी
डोक्यातला दारु पिण्याचा विचार काढुन टाकायला तुम्हाला अवघड जातं क?
दिवसभरात दारु प्यायला केव्हा ‘ वेळ ’ काढता येईल , याची योजना करता क?
सकाळी दारु प्यायल्या नंतर , पुन्हा दुपारी -रात्री सुद्धा पिणं होत क?
दारुच्या दुष्परीणामांची फिकीर न करता तुम्ही दारु पित राहता क?
उद्याच्या -पुढचा विचार न करता , आत्ता हवी तेवढी दारु प्यायलाच हवी , असा विचार करता क?
दारु प्यायलामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील याची माहीती असुन सुद्धा तुम्ही पिणं चालू ठेवता क?
एकदा दारु प्यायला सुरुवात केल्यानंतर ते पिणं थांबवणं तुम्हाला अवघड जातं क?
तुमचं दारु पिणं नियंत्रणात राहावं म्हणून मुद्दाम स्वेच्छेने दारु पासून काही दिवस / आठवडे मुक्त राहता क?
१० आदल्या दिवशी रात्री दारु जास्त झाली तर दुस र्‍या दिवशी तुम्हाला उतारा घेण्याची गरज भासते क?
११ आदल्या दिवशी रात्री दारु जास्त प्यायल्यामुळे दुस र्‍या दिवशी सकाळी हातांची थरथर होते क?
१२ दारु पिल्यावर / पीत असताना कधी उलटी होते क?
१३ आदल्या दिवशी दारु जास्त झाली म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी माणसात मिसळणं -बोलणं टाळता क?
१४ नशेत असताना तुम्हाला भितीदायक स्वप्नं पडतात क?
१५ आदल्या दिवशी नेमकं काय घडलं ते दुसर्‍या दिवशी आठवत नाही , असं होतं क?

प्रत्येक टप्यावर काय होतं?

१) सुरुवातीचा टप्पा :-

व्यसनाचं प्रमाण वाढतं.

ब्लॅक आऊट – ब्लॅक आऊट म्हणजे बेशुद्ध पडणे नव्हे, तर नशेच्या भरात आपण काय केलं हे दुसर्‍या दिवशी न आठवणं.

नशा केलेली नसतानाही पुढची नशा कधी करणार या विचारांनी मन व्यापणं.

२) मधला टप्पा :-

स्वत: च्या पिण्याचं समर्थन करताना आपण किती पीत आहोत यावरचं भान जातं.

स्वत:चं वागणं चुकीच आहे हे पटत असुनही मान्य न करणं.

‘ माझा कंट्रोल आहे’ हे सिद्ध करुन दाखविण्यासाठी काही काळ नशामुक्त राहुन दाखवलं जातं. (इथेच कुटुंबिय फसतात)

३) जुनाट टप्पा :-

बिंज पध्दतीनं दारु पिणं – काही दिवस सलग दारु पिणं व काही दिवस अजिबात न पिणं, असं आलटून पालटून चक्र सुरु राहतं.

या अवस्थेत शारीरिक व मानसिक समस्या सुरु झालेल्या असतात.