अपेक्षा

कुटुंबाकडुन वाजवी अपेक्षा काय अहेत ..

  • कुटुंबाने व्यसनी व्यक्तिकडुन वाजवी अपेक्षा ठेवाव्यात उदा. वेळेवर घरी येणे, मूलांचा अभ्यास घेणे, इतरांच्या दैनंदिन कामात मदत करणे
  • अपेक्षा स्पष्ट व पूर्ण होईल अशी असावी (साधी-सोपी)
  • बायकोने व्यसन याच एका गोष्टिवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वत:तील बदल, स्वत:कडुन अपेक्षा, कौटुंबिक गरजा याकडे लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे
  • मला ‘आज आणि आत्ता’ करण्या सारखे काय आहे यावर लक्ष केंद्रित करावे
  • व्यसनाच्या परिणामांची वैज्ञानिक माहिती स्वत: घेऊन इतरांना द्यावी
  • व्यसनी व्यक्तिशी आपला चूकीचा व्यवहार बदलावा
  • स्वच्छ व आनंदी कौटुंबिक वातावरण ठेवावे
  • आपापसातील सुसंवाद वाढवावा
  • प्रत्येक कुटुंबाचे नियम हे कुटुंबा प्रमाणे बदलू शकतात. हे नियम स्पष्टपणे मांडावेत व शांतपणे पाळावेत
  • प्रत्येक कौटुंबिक सदस्यांची आपापली भूमिका हवी
  • काही नियम कडक तर काही नियम शिथील काळानूरुप करावेत
  • कुठलेही बदल हे हळुहळु होतील याची जाणिव ठेवावी